प्रकरण दाबण्याचा खटाटोप ?
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील हायवेवर असणाऱ्या एका गावात एका युवतीवर सामूहिक शारीरिक अत्याचार करण्यात आले असून त्यातून पीडित युवती गर्भवती झाल्याचा संतापजनक प्रकार घडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. गर्भपात करण्यासाठी पीडित युवतीला तालुक्याच्या ठिकाणी एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले होते,मात्र त्या रुग्णालयातील डॉक्टर नी गर्भपात केल्यास हायरिस्क असल्याचे सांगितल्यामुळे गर्भपात केलेला नाही. पीडित युवतीवर अत्याचार करणारे नराधम हे तिच्या नात्यातीलच असल्याची चर्चा असून हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रकार होत होत आहे.दरम्यान पीडित युवतीला जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले असून पीडितेवर अत्याचार करणारे मात्र उजळ माथ्याने वावरत आहेत. त्यांना अद्दल घडणार की नाही ? या प्रकरणात महिला अत्याचारबाबत आवाज उठवणाऱ्या संघटनांनी ठोस भूमिका घेत पीडित युवती आणि तिच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन अन्यायाविरोधात दाद मागण्याचे धाडस आणणे गरजेचे असल्याचेही मत व्यक्त होत आहे.












