नवीन कुर्ली वसाहत स्वतंत्र ग्रा पं ला विरोध केल्याचे सिद्ध करा; रावराणे राजकारणातून संन्यास घेतील

आ.नितेश राणेंच्या नेतृत्वाखालीच युती शासन काळात नवीन कुर्ली ची स्वतंत्र ग्रा पं

90 % कुर्ली धरणग्रस्तांचे लोरे गावातील जमिनीवर माजी सरपंच तुळशीदास रावराणेंच्या पुढाकाराने पुनर्वसन

भाजपा लोरे शक्तिकेंद्रप्रमुख नरेश गुरव यांचे अनंत पिळणकर याना प्रत्युत्तर

कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत चा प्रश्न आमदार नितेश राणेंच्याच नेतृत्वाखाली सध्याच्या भाजपा शिवसेना युती शासन काळात मार्गी लागला आहे. आ.नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे काही दिवसांतच ग्रामविकास विभागाकडून स्वतंत्र ग्रामपंचायत चा आदेश निघणार आहे. लोरे नं गावचे माजी सरपंच तुळशीदास रावराणे यांच्या पुढाकाराने 90 टक्के कुर्ली धरणग्रस्तांचे पुनर्वसन लोरे नं 1 गावातील जमिनीवर अत्यल्प मोबदल्यात झाले आहे. देवघर धरणासाठी कुर्ली घोणसरी गावातील धरणग्रस्तांचे योगदान आहेच.या धरणग्रस्तांच्या पुनर्वसन क्षेत्रासाठी माजी सरपंच तुळशीदास रावराणे यांचेही योगदान आहे. नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत विरोधात तुळशीदास रावराणे, मनोज रावराणे यांनी पत्रव्यवहार केल्याचे अनंत पिळणकर यांनी सिद्ध करावे.तसे केल्यास तुळशीदास रावराणे राजकारणातून संन्यास घेतील असे आव्हान लोरे भाजपा शक्तिकेंद्रप्रमुख नरेश गुरव यांनी पिळणकर यांना प्रसिद्धीपत्रकातून दिले.साडेतीन पक्षाचे पुढारी असलेल्या अनंत पिळणकर यांची नवीन कुर्ली वसाहत गावात काय पत आहे ते पूर्ण तालुक्याला माहिती आहे. अनंत पिळणकर त्यांच्याच नवीन कुर्ली वसाहत गावात ताठ मानेने सर्व ग्रामस्थांसमोर फिरू शकत नाहीत.जेव्हा जेव्हा अनंत पिळणकर यांनी नवीन कुर्ली वसाहत मधील ग्रामस्थांवर अन्याय केला, त्यांच्यावर खुनी हल्ला केला तेव्हा तेव्हा मनोज रावराणे हे नवीन कुर्ली वसाहत मधील ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. राज्यात अडीच वर्षे मविकास आघाडी सरकार असताना सत्तेतील पक्षाचा पदाधिकारी म्हणून अनंत पिळणकर नवीन कुर्ली वसाहत स्वतंत्र ग्रामपंचायत चा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरले.पिळणकर यांनी केवळ मंत्र्यांना निवेदन देत फोटोसेशन करून शोबाजी केल्याची टीकाही नरेश गुरव यांनी केली आहे.

error: Content is protected !!