अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि कुशल कारागीर असलेला वर्कशॉप चालू करणार ; आनंद मेस्री

कंपनीची सिंधुदुर्ग मधील सर्वसाधारण सभा संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : सुतार समाजाची आर्थिक प्रगती व्हावी या उदात्त हेतूने समाजातील काही प्रमुख समाज बांधवानी सुरेश प्रभु आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने आणि आनंद मेस्त्री यांच्या मार्गदर्शना खाली सन. 2021 मधे सुतार समाज हस्तकला प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. ही एका विशिष्ट समाजाची शासन नोंदनीकृत अशी महाराष्ट्रातील पहिली कंपनी असल्याचा मान आपल्या सिंधुदुर्ग सुतार समाजाला मिळाला. या कंपनीची तिसरी सर्व साधारण सभा दिनांक 24 जुलै 2023 रोजी उद्यमानगर, कुडाळ येथे पार पडली.

कंपनीचे सी. ई. ओ. कोरगांवकर यांनी कंपनीच्या मागील एक वर्षातील कामकाजाची तसेच आर्थिक उलाढालीची सविस्तर माहिती दिली. अध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी कंपनीच्या पुढील वाटचाली संदर्भात माहिती देताना ही कंपनी भविष्यात आपल्या समाजातील कारागीरांच्या हाताला काम देऊन त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्न करेल आणि लवकरच कुडाळ एम. आय. डी. सी. येथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि कुशल कारागीर असतील असा परिपूर्ण वर्कशॉप चालू केला जाईल असे सांगितले. उपस्थित समाज बांधवानी या संपूर्ण सभेत मनामोकळेपणे चर्चेत सहभाग घेवून कंपनीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सभेच्या शेवटी उपस्थित सभासदाना छत्री भेट म्हणून दिली

या सभेस कंपनीचे अध्यक्ष आनंद मेस्त्री, सचिव गुरुनाथ मेस्त्री, उद्योजक दाजीसाहेब पांचाळ, कंपनीचे सी. ई. ओ. कोरगांवकर यांच्यासह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि सुत्रसंचालन उद्योजक प्रकाश मेस्री यांनी केले.

error: Content is protected !!