जागतिक व्याघ्र दिन शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त घोणसरी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक -05 मध्ये विद्यार्थ्यांना वाघाच्या जीवनशैलीवर आधारित चित्रफीत वनविभागाच्या वतीने दाखवण्यात आली. मानव व वन्यजीव संघर्ष याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास परिमंडळ वनाधिकारी फोंडा श्री. अनिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना वाघाच्या जीवनशैली विषयी व आदिवासा विषयी मार्गदर्शन केले. तसेच वनरक्षक श्री. अतुल तानाजी खोत यांनी लहान मुलांमध्ये वाघा विषयी प्रेम व आस्था निर्माण होण्यासाठी P.P.T दाखवत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका शालेय कमिटीचे अध्यक्ष श्री. मराठे तसेच वनाधिकारी वनपाल श्री. अ.भि. जाधव वनरक्षक श्री. अतुल पाटील श्री.अतुल खोत श्री. महालिंगप्पा शेगावे श्री. प्रकाश राणे व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!