नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर ,प्रहार ऑफिस शेजारी कणकवली चा उपक्रम
मोतीबिंदू शस्त्रक्रिया खर्चावर 20 % सवलत
कणकवली (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर , प्रहार ऑफिसच्या शेजारी यांच्या वतीने 2 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान मोतीबिंदू तपासणी शिबीर सकाळी 9 ते सायं. 7 या वेळेत आयोजित करण्यात आले असून 500 रुपयांची तपासणी केवळ 99 रुपयांत केली जाणार आहे. मोतीबिंदू चे निदान करण्यासाठी डोळ्यात औषध टाकून डोळ्यातील बाहुली मोठी केली जाते. स्लीट लॅम्प च्या माध्यमातून केलेल्या तपासणीतून मोतीबिंदू चे अचूक निदान होते. मोतीबिंदू ची तीव्रता ही त्यातून लक्षात येते. रुग्णांना मोतिबिंदू वर शस्त्रक्रियेसाठी 20 टक्के सवलत आहे. रुग्णांनी विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिसच्या शेजारी मोबा. 9850849315 / 8408803536 / 02367 – 233933 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.












