सांगरीदेवी विश्वकर्मा या ५४ वर्षीय मनोरूग्ण महिलेचे ४ वर्षांनी झाले कुटुंबियांसोबत पुनर्मिलन

मुंबईतील मानखुर्द येथून हरवली होती महिला

जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शोधले महिलेचे कुटुंबिय

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबईतील मानखुर्द येथून ४ वर्षांपुर्वी हरवलेली मनोरूग्ण महिला सांगरीदेवी विश्वकर्मा (वयः ५४ ) हिच्या कुटुंबियांचा शोध घेवून जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ओळख पटवून तीला नुकतेच तीच्या कुटुंबियांच्या ताब्यात सुपुर्द केले. व पणदूरच्या संविता आश्रमात सांगरीदेवीचे कुटुंबीयांसमवेत पुनर्मिलन करण्यात आले, तेव्हा तीच्या , कुटुंबियांच्या आणि उपस्थीत कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले.

      गोवा राज्यातील कोलवाले पुलाजवळ अत्यंत दयनीय परिस्थीतीत जीवन कंठीत असलेल्या एका निराधार अनोळखी व मनोरूग्ण महिलेची माहिती म्हापसा येथील सारस्वत महाविद्यालयातील श्रीम.किर्ती सावकार मँडम यांनी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांना दिली. रस्त्यावरच्या निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत असलेल्या संदिप परब यांनी तात्काळ कार्यकर्त्यांच्या मदतीने महिलेला कोलावले पोलिस स्टेशनच्या माध्यमातून संविता आश्रमात २९ आँगस्ट,२०२२ रोजी दाखल केले होते. आश्रमातील उपचारांनी सांगरीदेवीची प्रकृती सुधारल्यानंतर तीने नुकतेच तीचा मानखुर्द मुंबई येथील पत्ता कार्यकर्त्यांना सांगीतला. मानखुर्दच्या परिसरात कार्य करणा-या अपनालय संस्थेच्या  सिनिअर प्रोगाम मँनेजर सुनिता चौरे आणि स्थानिक कार्यकर्त्यां ज्योती लाटे यांनी सांगरीदेवीचे कुटुंबिय शोधण्या कामी मोलाचे सहाय्य केले.त्यांनी महिलेच्या कुटुंबाचा पत्ता शोधून  हरवलेली सांगरीदेवी पणदूरच्या आश्रमात असल्याची माहिती दिली. ४ वर्षांपुर्वी कोविड काळापुर्वी मानखुर्द येथून हरवलेल्या सांगरीदेवी यांचेबद्दलची मिसिंग कंपलेट मानखुर्द पोलिस स्टेशनला दाखल होती.आज सांगरीदेवीचे नातलग... नणंदेचे पती सत्यनारायण विश्वकर्मा, धाकटी जाऊ ..मिनादेवी विश्वकर्मा आणि पुतण्या अजय विश्वकर्मा यांनी  संविता आश्रमात येवून कुडाळ पोलिस स्टेशन येथे ओळख पटवून तिला ताब्यात घेतले.

 जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त अँड.किसन चौरे व संविता आश्रमचे जनसंपर्क अधिकारी उदय कामत, गोवा राज्य समन्वयक प्रसाद आंगणे , संस्थेच्या कार्यकर्त्या सौ.भक्ती परब , सौ.दळवी , सौ.चव्हाणा , आरती वायंगणकर, जानकी आंगणे, मनिषा यांचेसह महिलेचा आश्रमातील प्रवेश व कुटुंबीय पुनर्मिलन प्रक्रीयेत महत्वाची भुमिका राहिली.सांगरीदेवीची सेवा आणि शुश्रुषेत सर्व स्टाफ आणि नर्सनी मेहनत घेतली.
error: Content is protected !!