सरंबळ गावातील युवासेनेचे काम उत्कृष्ट : युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट

कै.देवेंद्र संजय पडते मित्रमंडळ आयोजित शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याकडून वह्या वाटप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य सरंबळ युवासेनेचे आयोजन

कुडाळ (अमोल गोसावी) : सरंबळ गावातील सरंबळ इंग्लिश स्कूल आणि प्राथमिक शाळेतिल विद्यार्थ्यांना कै. देवेंद्र संजय पडते मित्रमंडळ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या सौजन्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरंबळ युवासेना आयोजित सरंबळ गावातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शिवसेनेचे अतुल बंगे, नेरुर युवासेना विभाग प्रमुख वैभव सरंबळकर, कुडाळ शहर युवासेनेचे शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, कुडाळ शहर ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, सरंबळ युवासेनेचे शाखाप्रमुख संतोष राणे, युवासेना उपशाखा प्रमुख शामसुंदर करलकर, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम साटम, ग्रामपंचायत सदस्या शीतल हळदणकर, गणपत (बाळा) जाधव, अजय राणे, संतोष कदम, युवासेना गटप्रमुख निखिल गोसावी, मनोज दांडकर, वसंत राणे, सरंबळ इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक अनिल होळकर, इंग्लिश स्कूलचे विवेकानंद बालम तसेच पूर्ण प्राथमिक शाळा नं २, पूर्ण प्राथमिक शाळा नं १, पूर्ण प्राथमिक शाळा तळेवाडी येथे वह्या वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!