चौके (अमोल गोसावी) : राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक ३१/७/२०२३ रोजी धामापूर बौद्धवाडीतील सभासदांची बैठक सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विद्याधर धोंडु कदम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती
यावेळी मालवण तालुका प्रभारी अध्यक्ष पुरुषोत्तम मालवणकर, मालवण तालुका संघटक, सामाजिक कार्यकर्ते तथा चौकेचे उपसरपंच पी. के. चौकेकर, चौके गावशाखेचे संघटक, माजी पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य आयु. दुलाजी चौकेकर उपस्थित होते. धामापूर गावचे प्रतिष्ठीत नागरिक व गावशाखेचे प्रणेते विलास कृष्णा नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती
या मिटींगचे आयोजन करण्यामागची भुमिका गावशाखा निर्मिती मागचे प्रणेते आयु. विलास नाईक यांनी जिल्हाध्यक्ष यांच्या समोर स्पष्ट केली तसेच राजरत्न आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीची माहिती जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत जाधव यांनी देऊन येथील बौद्ध बांधवांना या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला असे सांगून उपस्थितांचे स्वागत केले. तत्पुर्वी बुध्दवंदना घेऊन बैठकीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी मालवण तालुका प्रभारी अध्यक्ष आयु. पुरुषोत्तम मालवणकर यांनी प्रास्ताविक केले. मालवण तालुक्यातील बरीच गावे आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झाली असुन लवकरच मालवण तालुका कार्यकारिणी अंतिम करण्यात येणार आहे असे सांगितले.
त्यानंतर जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते दिवंगत अशोकराव मुकुंदराव आंबेडकर यांच्या कडे नामदार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कशी आली व आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या कशी कार्यरत आहे याची माहिती उपस्थितांना दिली. संस्थेचे उपक्रम आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहेत ज्यामध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर मल्टीस्टेट कोआँपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्था, नागपूर येथील जागतिक दर्जाचे विद्यापीठ प्रस्तावित आहे याची माहिती व दहा उद्दीष्टे पुर्तता करण्यासाठी ही संघटना जागतिक बौद्ध संघटनेशी संलग्न कशी केली याची माहिती दिली. त्यानंतर गावशाखेची कार्यकारिणी निवडण्यात आली
अध्यक्ष – सुजय रामचंद्र कदम,
उपाध्यक्ष – संजय रामचंद्र जाधव,
उपाध्यक्ष – सो. सोनम सुजय कदम,
सचिव – संदेश विठ्ठल धामापुरकर,
कोषाध्यक्ष – सचिन सुर्यकांत कोळंबकर,
संस्कार विभाग प्रमुख – गणेश जयराम नाईक,
सहसचिव – सौ. साक्षी सुर्यकांत नाईक,
संघटक- सौ. वृशाली विलास नाईक,
संघटक – सौ. सानिया संजय जाधव
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी प्रभारी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम मालवणकर, पी. के. चौकेकर, दुलाजी चौकेकर, विलास नाईक यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. तर सचिन कोळंबकर यांनी आभार मानले.
बैठकीला सूर्यकांत नाईक, लीलावती कदम, सूमन धामापूरकर,करुणा धामापूरकर, संजना कोळंबकर, लक्ष्मी कोळंबकर आदि सभासद उपस्थित होते.











