भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांचा हल्लाबोल
देवगड (प्रतिनिधी) : भाजपा युवा नेते आमदार नितेश राणेंवर टीका करणारे अतुल रावराणे बैलबुद्धी आहेत. आमदार नितेश राणेंची राजकीय उंची मोजण्याची अतुल रावराणे यांची लायकी नाही. गेंड्या सारखे शरीर वाढले म्हणजे बुद्धी वाढत नाही. जे स्वतःच्या आचिर्णे गावची सोसायटी, ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाही त्या अतुल रावराणेंनी आमदार नितेश राणेंवर टीका करू नये. आमच्या नेत्यांच्या शारीरिक उंचीवर जात असाल तर तुम्हाला गेंडा म्हणावं लागेल अशी प्रखर टीका भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांनी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणेंवर केली. आमदार नितेश राणे हे भाजपाचे राज्यस्तरिय नेते आहेत.म्हणूनच आमदार नितेश राणेंवर उबाठा सेनेचा वाचाळविर संजय राऊत चे वस्त्रहरण करण्याची जबाबदारी भाजपाने दिली.आणि आ.नितेश राणेंनी आपली जबाबदारी चोख पार पाडून तुमच्या वाचाळविर आणि थेट मातोश्रीलाही नामोहरम केले आहे. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचा आमदार नितेश राणे यांनी केलेला विकास अतुल रावराणे यांना कधीच दिसणार नाही. कारण ते फक्त विरोधाचे राजकारण करतात. ज्या वैभववाडी पं स इमारतीच्या उदघाटनावरून अतुल रावराणे यांनी आमदार नितेश राणेंवर टीका केली त्या इमारतीची मान्यतासुद्धा विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीच आणली होती. इमारत बांधकामासाठी निधीही केंद्रीयमंत्री राणेंनीच त्यावेळी आणला होता. सध्या तांत्रिक बाबींमुळे लोकार्पण न झालेल्या पं स इमारती च्या मुद्द्यात फक्त स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी अतुल रावराणे नाहक आमदार नितेश राणेंवर टीका करत आहेत. जेव्हा अतुल रावराणे आमदार नितेश राणेंवर टीका करत होते त्याचवेळी आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे वैभववाडी, देवगड आणि कणकवली नगरपंचायत साठी 10 कोटींच्या विकासनिधी च्या प्रशासकीय मान्यतेची लेखी ऑर्डर जिल्ह्यात आली होती. यावरून अतुल रावराणे यांनी स्वतःची पात्रता ओळखावी. कहा राजा भोज..कहा गंगू तेली अशा शब्दांत अतुल रावराणेंवर टीका करताना अतुल रावराणे यांनी स्वतःला आवर घालून भान ठेवून टीका करावी अन्यथा देवगड तालुक्यात फिरू देणार नसल्याचा इशाराही बगदादी यांनी दिला आहे.











