भाग्यश्री तांबे च्या सुसाईड नोट मध्ये काही युवकांची नावे

आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाग्यश्री अनिल तांबे हिच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे. तिने आत्महत्या दडपणाखाली येवून केल्याचे स्पष्ट झाले असले तरी तिने लिहिलेल्या सुसायट नोटमध्ये काही युवकांची नावे आहेत. त्यामुळे युपीएससी परीक्षेच्या दडपणाखाली येवून तिने आत्महत्या केली की चिठ्ठीत नावे असलेल्या व्यक्तींच्या दडपणाखाली येवून आत्महत्या केली याचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत. दरम्यान, तिने आत्महत्याच केली असल्याचे तिच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले असून आज तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ओरोस भवानी मंदिर परिसरातील सुवर्ण कलश बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय भाग्यश्री तांबे हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघड झाली होती. भाग्यश्री ही युपीएससी परीक्षेची तयारी करीत होती. मुलगी युपीएससी परीक्षेची तयारी करीत होती. त्यासाठी ती सुरुवातीला पुणे येथे शिक्षणासाठी होती. त्यानंतर ती दिल्ली येथे शिक्षणासाठी गेली होती. गेले पाच महिने ती येथे राहत होती. येथून ऑनलाईन पद्धतीने युपीएससी क्लास जॉइंड करीत होती. आई आणि ती अशी दोघेच घरी राहत होती. रविवारी रात्री जेवण करून ती आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेली. सकाळी ८ वाजता ती उठली नाही म्हणून आईने आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडत आतमध्ये प्रवेश केल्यावर तिचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

error: Content is protected !!