वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथे वयोवृद्ध महिलेचा घातपात

मंगळवारी रात्री घटली घटना, श्वानपथकासह पोलिस घटनास्थळी दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावात एक धक्कादायक घटना घडली. सोनाळी वाणीवाडी येथील ६५ वर्षीय महिलेची अज्ञातांनी धारधार हत्याराने वार करून हत्या केली आहे.जयश्री साटम असं या महिलेच नाव असून तिच्या छातीवर हत्याराने वार केल्याचे आढळून आले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सोनाळी गावचे सरपंच भीमराव भोसले हे काही कामानिमित्त साटम यांच्या घरी गेले. असता त्यांना जयश्री साटम यांचा मृतदेह दिसुन आला त्यांनी तात्काळ वाडीतील ग्रामस्थांना व पोलीस प्रशासनाला सदर घटनेची कल्पना दिली असून पोलिस प्रशासन अधिक तपास करीत आहे.

error: Content is protected !!