आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांची पुण्यतिथी दैवज्ञ समाजाच्या वतीने साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : भारताची आर्थिक राजधानी मुंबईचे शिल्पकार व आधुनिकतेचे पाया घालणारे जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांची 158 पुण्यतिथी कणकवली दैवज्ञ सुवर्णकार संघा च्या वतीने साजरी करण्यात आली. दैवज्ञ समाजाचे माजी नगरसेवक संजय एकामतेकर यांनी पाच वर्ष नगरपंचायत मध्ये यशस्वी कारकीर्द केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुंबई सुवर्णकार संघ यांचा सिंधुदुर्ग जिल्हा युवा मंच म्हणून गणेश तळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावर्षी विशेष सत्कार ऍड. पद्मश बेलवलकर यांनी एल एल बी मधे फर्स्ट क्लासने यश मिळविल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला . घनःश्याम बेळेकर याने दहावी मध्ये 90 टक्के गुण मिळविलेबद्दल त्याच्या सत्कार करण्यात आला.यावेळी कणकवली व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर , कणकवली सुवर्णकार तालुकाध्यक्ष मोहन तळगावकर, महेश कुडाळकर ,दादा बेलवलकर ,शशांक हिर्लेकर ,संजय कामतेकर, संजय बेलवलकर, गजानन महाजन, हेमंत मालवणकर, सतीश मसूरकर, मंगेश मसुरकर ,गणपत महाजन, व राजू हिरलेकर तुषार बेळेकर व सुवर्णकार बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!