खारेपाटण (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील ब्रिटिशकालीन पहिली मराठी प्राथमिक शाळा म्हणून ओळख असणारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचा १६३ व वर्धापन दीन अर्थात शतकोत्तर हीरक महोत्सव आज शाळेत विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उस्ताहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळेचे माजी विद्यार्थी व शाळेचे आधारस्तंभ आदर्श व प्रभावी व्यक्तिमत्व श्री अमोल तळगावकर सर व खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य श्री गुरूप्रसाद शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ प्रियंका गुरव,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंगेश ब्रम्हदंडे,इतिहास प्रेमी - श्री ऋषिकेश जाधव,समिती सदस्य सौ संध्या पोरे खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
१ ऑगस्ट १८६० रोजी खारेपाटण गावात पहिली मराठी शाळेची स्थापना करण्यात आली.जवळ जवळ मागील सात पिढ्यांना शिक्षण देणारी ही ऐतिहासिक व ब्रिटिशकालीन ही शाळा असून शाळेने आज १६३ वर्षात पदार्पण केले आहे.शाळेच्या या एकूण प्रवासात शाळेने आज कात टाकली असून महाराष्ट्र राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल म्हणून या शाळेला शासन मान्यता मिळालेली आहे.आज पर्यंतच्या काळात या शाळेने विविध मुख्यध्यापक व शिक्षक या शाळेने बघितले.परंतु या शाळेचे विद्यमान असलेले उच्च श्रेणी मुख्यध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी या शाळेला एक उच्च शिखरावर नेऊन ठेवले असून शाळेला रोल मॉडेल रूप प्राप्त केले आहे.असे भावपूर्ण उदगार श्री अमोल तळगावकर यांनी यावेळी व्यक्त केले. "आपली प्राथमिक शाळा हे आपल्या संस्काराचे पहिले केंद्र असते.येथून घडणारा विद्यार्थी हा आपल्या पहिल्या मातृशाळेला कधीच विसरत नाही.ज्याच्यामुळे आपण घडलो त्या शाळेचे आपण काही तरी देणं लागतो.या उदात भावनेने शाळेकडे बघितल्यास आणि शाळेला मदत केल्यास शाळांचा विकास व्हायला वेळ लागणार नाही."असे प्रतिपादन खारेपाटण केंद्र शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संतोष पाटणकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना काढले. यावेळी खारेपाटण गावचे नागरिक इतिहास प्रेमी श्री ऋषिकेश जाधव,शाळेच्या अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी,शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी शाळेविषयी आपले ऋन व्यक्त करत शाळेच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी खारेपाटण जि.प. केंद्र शाळेच्या १६३ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मोठा केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.
तर शालेय विद्यार्थ्यांनी शाळेला भेट वस्तू देऊन वर्धापन दीन कार्यक्रमात सहभाग घेतला.या कार्यक्रमास शाळेचे शिक्षिका श्रीम.रुपाली पारकर,अलका मोरे, रुपाली पारकर,आरती जेजोन,स्मिता कोरगावकर,श्री कोंडविलकर सर,श्रीम.अमृता ब्रम्हदंडे,अबिदा काझी तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार शाळेच्या शिक्षिका श्रीम.रेखा लांघी यांनी केले.

















