शिवसेना नेते अतुल रावराणेंनी पालकमंत्री चव्हाण यांची भेट घेत केली मागणी
शाखा अभियंता सुतार यांनी नाहक 1 कोटी 70 लाखांचे अंदाजपत्रक केल्याचा रावराणेंचा आक्षेप
वैभववाडी (प्रतिनिधी) : 10 वर्षांपूर्वी बांधलेल्या वैभववाडी पं स च्या उदघाटन विना वापरात नसलेल्या इमारतीसाठी आवश्यक फर्निचर साठी तात्काळ 25 लाख निधी मंजूर करून ह्या इमारतीचे लोकार्पण करावे अशी मागणी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेत केली. अतुल रावराणे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील 10 वर्षांत इमारत बांधून पूर्ण झाली पण इमारत आतील फर्निचर व अन्य साहित्यामुळे विनावापर पडून राहिली. पालकमंत्री म्हणून आपण तात्काळ 25 लाख रुपये मंजूर केल्यास सदर इमारत जनतेच्या कामांसाठी वापरात येईल. त्यांनंतर आणखी 65 लाखांचा निधी मंजूर करावा जेणेकरून परिपूर्ण फर्निचर, आतील सुविधा आणि वॉल कंपाउंड चे काम पूर्ण होईल.जि प चे शाखा अभियंता सुतार यांनी सुमारे 90 लाखांचा शिल्लक कामासाठी 1 कोटी 70 लाखांचे अंदाजपत्रक बनवले आहे.या फुगीर अंदाजपत्रकामुळे निधी मिळण्यात अडचणी येत असून शाखा अभियंता सुतार यांनी बनवलेल्या 1 कोटी 70 लाखांच्या अंदाजपत्रकाची शहानिशा करावी असेही रावराणे यांनी म्हटले आहे.










