ॲड.अग्निवेश तावडे यांचे एलएलएम परीक्षेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील उदयोन्मुख वकील अग्निवेश तावडे यांनी एलएमएम परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. ॲड. तावडे यांनी एलएलबी आणि एलएलएम या दोन्ही पदव्या कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमधून प्राप्त केल्या आहेत. ॲड. अग्निवेश यांनी ८१ टक्के गुण मिळवून मेरिटमध्ये एलएलएम पदविका प्राप्त केली आहे.

ॲड. तावडे यांचे प्राथमिक शिक्षण येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये झाले, तर डिप्लोमा इन सायबर लॉ मुंबई गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून केला. अग्निवेश हा कणकवलीतील प्रथितयश डॉ. विजय तावडे यांचा मुलगा असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांचा पुतण्या आहे. विशेष म्हणजे कायदे क्षेत्रात तावडे यांची ही चौथी पिढी कार्यरत आहे. शाळांना विविध भेटवस्तू देणे, वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांशी संवाद साधणे आदी उपक्रमांतून अॅड. तावडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी नेहमी जपली आहे. आता एलएलएम पदवी प्राप्त झाली तरी अजून शिकत राहणे, आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा फायदा इतरांना कसा होईल, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे ॲड. अग्निवेश यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!