कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तहसिलदारपदी रुजू झालेले नूतन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची कणकवली तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत स्वागत केले. भाजपा कणकवली विधानसभा संघटक तथा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शेतकरी ख वि संघ चेअरमन प्रकाश सावंत, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर, संदीप सावंत, सुभाष मालंडकर, आनंद घाडी, उमेश घाडीगांवकर, स्वरूप कोरगावकर आदी उपस्थित होते.













