अर्धा रस्ता गेला वाहून ; माडाची झाडेही कोसळून गेली समुद्रात
देवगड (प्रतिनिधी) : तांबळडेग किनारपट्टी भागाला लाटांचा तडाखा बसून धुप झाल्याने उत्तरवाडा येथील अर्धा रस्ता वाहून गेला असून किनारपट्टीलगत असलेली माडाची झाडेही पाण्याचा प्रवाहाबरोबर कोसळून पडली.किनाèयालगत समुद्राचा पाण्याचा प्रवाह सरकू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तांबळडेग समुद्रकिनारपट्टीची सध्या मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याने किनारपट्टीलगत असलेल्या कुटूंबिये भीतीच्या छायेखाली आहेत.उत्तरवाडा येथे रमेश सनये यांच्या घरालगत असलेल्या किनारपट्टीची धूप होवून किनारपट्टीलगत अर्धा रस्ता वाहून गेला आहे.यामध्ये माडही पडले असून किनारपट्टीलगत रमेश सनये यांच्या जागेत साईमंदीर आहे.या मंदीरापर्यंत पाणी पोहचल्याने भविष्यात वस्तीपर्यंत येण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. किनारपट्टीलगत असलेल्या झाडांनाही होत असलेल्य धुपेचा मोठा \टका बसत आहे.समुद्रकिनारपट्टी भागात धुपप्रतिबंधक कायमस्वरूपी बंधारा तात्काळ बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. उधाणावेळी लाटांचा तडाखा बसत असून तीन वर्षापुर्वी तांबळडेग स्मशानभुमीही वाहून गेली होती तर १२ लाख रूपये खर्चुन बांधलेला मासळी सुकविण्याचा ओटा उधाणावेळी आलेल्या लाटांच्या तडाख्याने वाहून गेला होता. समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने तांबळडेग किनारपट्टीची होत असलेली धुप व वस्तीच्या दिशेने सुरू असलेला समुद्राचा प्रवास यामुळे तांबळडेग गाव भीतीच्या छायेखाली असून कायमस्वरूपी पक्का दगडी धुपप्रतिबंधक बंधारा बांधून मिळावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.












