तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावातील दाबवाडी येथील रहिवासी कै. पार्वती यशवंत धुरी यांचे गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने धुरी कुटुंबीयांवर तसेच दाबवाडी व परिसरातील ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कै. पार्वती धुरी या अत्यंत प्रेमळ, मायाळू, साध्या, सुस्वभावी आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील कायमचे प्रसन्न हास्य, प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाण्याची वृत्ती, घरातील प्रत्येकावर असलेली माया आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना दिलेला प्रेमळ आधार यामुळे त्या सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेल्या. त्यांच्या जाण्याने केवळ धुरी कुटुंबीयांनीच नव्हे, तर गावानेही एक प्रेमळ, जिव्हाळ्याचं आणि संस्कार जपणारं व्यक्तिमत्त्व गमावलं आहे. त्यांच्या पश्चात मुले, सूना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
कासार्डे दाबवाडी येथील पार्वती धुरी यांचे निधन












