कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट लगत असलेल्या हरकुळ खुर्द, हुलेवाडी येथील एका तरुणाने आपल्या राहत्या घराच्या छपराच्या लोखंडी बाराला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप विनायक हुले (२८) असे त्याचे नाव असून ही घटना सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. करण्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, त्याने आत्महत्या
संदीप हुले याची पत्नी मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी सोमवारी दुपारी गेली होती. त्यावेळी तो घरात होता. त्याची पत्नी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मुलांना घेऊन घरी परतली. त्यावेळी संदीप हा गळफास लावलेल्या स्थितीत तिला आढळून आला. समोरचे दृश्य पाहताच तिला धक्काच बसला. तिने तत्काळ नातेवाईक तसेच शेजाऱ्यांना या घटनेबाबत सांगितले. तर या घटनेबाबतची माहिती संदीप याचा चुलत भाऊ ऋषिकेश हुले याने कणकवली पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर तत्काळ पोलिस हवालदार उत्तम वंजारे व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनीही भेट देत पाहणी केली.
संदीप हुले हा फोंडाघाट येथील एका गॅरेज मध्ये कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे. मात्र, त्याने आत्महत्या नेमकी का केली? याबाबतचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.












