बीएसएनएल च्या अखंडीत सेवेसाठी युवासेनेचा मदतीचा हात

चौके (अमोल गोसावी) : खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेल्या बागायत टॉवर व त्याला जोडण्यात आलेले बिळवस, मळगाव* येथील बी. एस. एन. एल. टॉवर गेले कित्येक दिवस लाईट गेल्यावर बंद होत होते त्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. युवासेनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बॅटरी ची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान आज युवासेना पदाधिकारी उपतालूका प्रमुख अमित भोगले, विभाग प्रमुख राहूल सावंत, शाखा प्रमुख किशोर कासले, मंगेश परब, भाई माधव, साईश खोत यांनी स्वखर्चाने व श्रमदानाने बीएसएनएल ला सहकार्य करत सर्व बॅटरी काळसे, बागायत, हेदुळ येथे पोच केले. यावेळी मालवण बीएसएनएल चे अधिकारी प्रविण कवडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!