देवगड (प्रतिनिधी) : मालवण येथील प्रकाश शेट्टीगार यांची देवगड बंदरात असलेल्या नौकेवर खलाशी म्हणून कामाला आलेल्या दुर्गाप्पा लक्ष्माप्पा कोरवार(४२) रा.मंडलेगीरी कुकनूर कर्नाटक याचा सोमवारी नौकेवरून फिट येवून पडल्याने पाण्यात पडून बुडून मृत्यु झाला.त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी ४.१० वा.सुमारास देवगड खाडीत मिळाला. मालवण येथील प्रकाश दामोदर शेट्टीगार यांच्या देवगड बंदरात असलेल्या नौकेवर खलाशी म्हणून कामाला दुर्गाप्पा लक्ष्माप्पा कोरवार(४२) रा.मंडलेगीरी कर्नाटक हा आपल्या सहकाèयांसमवेत सोमवारी सकाळी १० वा आला होता.त्याला वरचेवर फिट येण्याची सवय होती.सोमवारी सायंकाळी ५ वा.सुमारास तो नौकेवरून चक्कर येवून पाण्यात पडला.त्याचा शोध घेवून तो मिळाला नाही.मंगळवारी सायंकाळी ४.१० वा.सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत पाण्यात मिळून आला.याबाबतची खबर त्याचा भाऊ गौडाप्पा लक्ष्माप्पा कोरवार यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.तपास पोलिस हवालदार राजन जाधव व आशिष कदम करीत आहेत.
नौकेवर कामासाठी दाखल झालेल्या खलाशाचा पाण्यात पडून मृत्यु ; देवगड बंदरातील घटना









