शेतक-यांना खत वेळेत देण्याचे नियोजन यशस्वी ; ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तालुक्यातील शेतक-यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी काम करत आहे. गेल्या वर्षभरात आधारभुत किंमत योजनेअंतर्गत शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात भात खरेदी करण्यात आली . 14 हजार 259 क्विंटल भात खरेदी करण्यात आली. पुढील चालु हंगामात घोणसरी आणि हरकूळ अशा 2 केंद्रांवर भात खरेदी केली जाणार आहे. विकास संस्थांना चालु हंगामात वेळेवर खत पुरवठा करण्यात आम्हाला यश आले आहे. शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने कणकवली खरेदी विक्री संघाचे कामकाज सुरु असल्याचा विश्वास चेअरमन प्रकाश सावंत यांनी व्यक्त केला.
कणकवली खरेदी विकी संघ सभागृहात 51 वी वार्षिक सर्व साधारणसभा चेअरमन प्रकाश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला बॅंक संचालक विठ्ठल देसाई,व्हाईस चेअरमन सुरेश ढवण, संचालक सदानंद हळदिवे,गणेश तांबे,किरण गावकर,संजय शिरसाट,श्रीपत पाताडे,रघुनाथ राणे,प्रशांत सावंत, मिथिल सावंत, पंढरी वायंगणकर,लिना परब,स्मिता पावसकर,व्यवस्थापक गणेश तावडे,गुरुनाथ पावसकर,असलदे चेअरमन भगवान लोके,सुशील पारकर , फोंडाघाट सोसायटी चेअरमन राजन नानचे , राजेंद्र सावंत , संदिप तोरसकर , प्रकाश घाडीगांवकर, अनिल सुखटणकर,माजी नगरसेविका कविता राणे आदींसह तालुक्यातील विकास संस्था चेअरमन व संघाचे सभासद सभेला उपस्थित होते. या सभेत नुतन बॅंक संचालक, मजुर फेडरेशन चेअरमनपदी विठ्ठल देसाई यांची निवड झाल्याबद्दल पुच्छगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रकाश सावंत म्हणाले, संघाचा चालु वर्षामध्ये व्यापारी नफा कमी झाला आहे. कारण जीवनावश्क वस्तुंची घट झालेली आहे. त्यामुळे समता डि. पी रोडला गणेश चतुर्थी पुर्वी सुरु करण्याबाबत आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच संस्थेचा कारभार पारदर्शक करण्यास भर देत आहोत.
या सभेत विविध विषयांवर व संस्थेच्या हितासाठी विविध सुचना सभासदांनी मांडल्या . त्यावर चर्चा होत पुढील आर्थिक वर्षात चांगल्या पद्धतीने कामकाज करण्याचा विश्वास सभा अध्यक्षांनी व्यक्त केला. सभेपुढील विषयाचे वाचन व्यवस्थापक गणेश तावडे यांनी केले. सभा खेळीमेळीत पार पडली. उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन सुरेश ढवण यांनी मानले.












