आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री यांचे प्रत्युत्तर
कुडाळ (अमोल गोसावी) : आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री यांनी काल गुरुवारी कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी आंबडपाल उपसरपंच धीरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी पत्रकार परीषद घेत सरपंच महेश मेस्त्री हे शिवसेनेचे पदाधिकारी नाहीत अशी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री यांनी कुडाळ भाजप कार्यालय येथे पत्रकार परीषद घेत गोट्या चव्हाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सांगितले की , मी गेली दहा वर्षे शिवसेनेचाच कार्यकर्ता होतो, मी सेनेचा कार्यकर्ता असल्यानेच मागील निवडणूकीत माझ्यविरुद्ध उमेदवार दिला नाही. असे असताना उबाठा सेनेने मला कोणत्याही गोष्टीत विश्वासात घेतले नाही. आणि महत्वाच्या निर्णयापासून अलिप्त ठेवले हे सर्व बारकाईने पाहता मला माझ्यावर अन्याय झालेला दिसला. त्यामुळे येणाऱ्या काळात गावाचे प्रश्न भाजप पक्षाच्या माध्यमातून सोडवू शकतो असा विश्वास मला वाटत असल्याने माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरीत होऊन मी माझ्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
त्याचप्रमाणे यावेळी साजुराम नाईक यांनी आपली बाजू मांडताना असे सांगितले की , ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान केले आणि मला मताधिक्याने निवडून दिले त्या माझ्या मतदारांचा जर भ्रमनिरास होत असेल आणि त्यांचे एकही काम होत नसेल तर मला या पक्षात राहून काय फायदा आहे ? असे वाटल्याने मी माजी खासदार निलेश राणे यांच्या कामाची धडाडी पाहून मला खात्री पटली आहे कि माझ्या गावाचा विकास भाजपच करू शकते म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.असल्याचे वेताळ बांबर्डे तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य साजुराम नाईक यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे पावशी जि. प. विभागीय अध्यक्ष सुरेश तानावडे यांनी सांगितले की, गोट्या चव्हाण यांनी पत्रकार परीषद घेताना गावाच्या विकासावर बोलावे उगाच कोणालाही बदनाम करण्याचे प्रयत्न करू नये. आणि चव्हाण यांना जे काही सांगायचे आहे ते आमने सामने मिडीया समोर येउन बोलावे अन्यथा आपले सर्व कारनामे आम्ही बाहेर काढू असे आव्हान तानावडे यांनी गोट्या चव्हाण यांना दिले. आमदारांनी गावच्या विकासासाठी पाच वर्षात फक्त पाच कामे दिली आहेत तसेच या कामांमध्ये गोट्या चव्हाण यांनी किती कमिशन घेतले आहे हे आम्हाला काढायला लावू नये. काम केले ते गावाच्या विकासासाठी केले कि टक्केवारीसाठी केले हे त्यांनी सांगावे. अशी टीकाही यावेळी तानावडे यांनी केली.
दरम्यान यावेळी तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सरपंच महेश मेस्त्री हे उबाठा सेनेचे कार्यकर्ते असल्याचा पुरावा सादर केला. यावेळी आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री , वेताळ बांबर्डे तंटामुक्ती अध्यक्ष साजुराम नाईक, पावशी जि. प. विभागीय अध्यक्ष सुरेश तानावडे, नागेश आईर , सुनिल बांदेकर , श्रीपाद तवटे , संजय वेंगुर्लेकर , दिपक नारकर , बंड्या सावंत , रुपेश कानडे. आदी भाजप पदाधिकारी उपस्थित हो












