कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कणकवली आयोजित कणकवली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच विद्यामंदिर प्रशाला कणकवली येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. मीरा मकरंद आपटे हिने द्वितीय क्रमांक पटकावत प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या विषयावर तिने अतिशय ओघवते वक्तृत्व सादर करून उपस्थित रसिक व परीक्षकांची मने जिंकली. सदर स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कु.मीरा हिच्या या उज्ज्वल यशाबद्दल तिचे क.ग.शि.प्र. मंडळ मुंबई चे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमनआर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी हार्दिक अभिनंदन केले.
मीरा हिला प्रशालेतील संस्कृत शिक्षक व तिचे वडील मकरंद आपटे व सहाय्यक शिक्षिका पल्लवी हाटले यांचे मार्गदर्शन लाभले.












