आ. नितेश राणेंमुळे आम्हाला तात्काळ न्याय मिळाला ; बेकायदेशीर असलेला तो सेल कायदेशीर बंद करण्याची प्रक्रिया होती वेळखाऊ

कणकवली कापड विक्रेता संघटनेने मांडली भूमिका

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत याआधी आलेले सर्व सेल हे किरकोळ व्यापाऱ्यांचे होते.मात्र यावेळी आलेला सेल व्यापारी हा कोल्हापूर गांधीनगर येथील घाऊक व्यापारी होता. त्यामुळे कणकवलीतील स्थानिक बाजारपेठेतील कापड दुकान आणि त्या सेल मधील दरात फरक हा होताच.घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापार करू नये असा अलिखित नियम असतो.मात्र सदर व्यापाऱ्याने सेलद्वारे किरकोळ व्यापाऱ सुरू केला. ऐन सणाच्या तोंडावर आमचे नुकसान होत होते.त्यामुळे आम्ही किरकोळ विक्रेत्या व्यापाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष नलावडें च्या माध्यमातून आमदार नितेश राणेंच्या कानावर आमची खंत व्यक्त केल्यावर तो सेल लगेच बंद झाला आणि आम्हाला न्याय मिळाला . कायदेशीर दृष्ट्या त्या सेल चा व्यापार हा बेकायदेशीर होता मात्र कायदेशीर प्रक्रियेने सेल बंद करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे आमदार नितेश राणेंकडे गेल्यानंतर आम्हाला लगेच न्याय मिळाला त्यामुळे आम्ही समाधानी आहोत असे कणकवली कापड व्यावसायिक संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मंदार आळवे यांनी सांगितले.यावेळी महेश देसाई, सुरभा घाडीगांवकर, प्रवीण डामरी, दादा केणी, रमित घाणेकर, रामू बजाजी, सतीश गावडे, सूरज रणशूर आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मंदार आळवे म्हणाले की सर्वसामान्य ग्राहक जनतेच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत. ग्राहकांच्या फायद्याआड आम्ही कापड विक्रेते कधीही नव्हतो आणि यापुढेही नसणार. त्या सेल च्या व्यापाऱ्याने सणाच्या तोंडावर दिशाभूल करणारा व्यवसाय सुरू केला होता. विक्री करत असलेल्या मालाचा दर्जा काय होता ? याचाही विचार करणे गरजेचे आहे. कणकवलीतील स्थानिक व्यापाऱ्यांचेही कुटुंब आहे.त्यांचेही कर्ज, आणि अर्थकारण आहे याचाही विचार व्हायला हवा. सेल वाला व्यापारी हा घाऊक विक्रेता होता पण त्याने जिल्ह्यात एकाही किरकोळ विक्रेत्याला कापड विक्री तो करत नव्हता . तसे असते तर त्याने जिल्ह्यात असा सेल सुरू केला नसता कारण त्या सेल मुळे त्याच्याकडून कापडवस्तू घेणाऱ्या जिल्ह्यातील त्याचे गिऱ्हाईक असलेल्या किरकोळ विक्रेत्याला आर्थिक फटका बसला असता . त्यानंतर या सेल व्यापाऱ्याला त्याचे गिऱ्हाईक असलेल्या त्या सेल लावलेल्या व्यापाऱ्याला जाब विचारला असता. यापुढे अशा प्रकारे घाऊक व्यापाऱ्याने कणकवलीत सेल लावल्यास त्याबाबत कोणती दक्षता घ्यावी याची आम्ही खबरदारी घेत आहोत.

error: Content is protected !!