खारेपाटण (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स तसेच बाल मंदिर कनेडी आयो जित माजी गुरुवर्य पुरस्कृत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण प्राथमिक विभाग यांचा बालगटामध्ये (इयत्ता पहिली ते चौथी) प्रथम क्रमांक तसेच उच्च प्राथमिक विभागाचा (इयत्ता पाचवी ते सातवी) द्वितीय क्रमांक आला आहे.
संपूर्ण तालुक्यातून २५ स्पर्धक संघाचा सहभाग होता.
दोन्ही स्पर्धक संघांना संगीत शिक्षक संदिप पेंडूरकर यांचे मार्गदर्शन मिळाले.प्रशालेचा माजी विद्यार्थी कु. मयूर जाधव, तबला विशारद कु.वेदांत कुयेस्कर, प्रशालेच्या विद्यार्थिनी कुमारी आर्या मोसमकर व कुमारी अनुष्का ठोसर यांची संगीत साथ या दोन्ही संघांना लाभली .
या यशाबद्दल दोन्ही संघांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे,सचिव महेश कोळसुलकर,खजिनदार संदेश धुमाळे,सहसचिव राजेंद्र वरूणकर, सर्व संचालक मंडळ,प्राचार्य संजय सानप,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.दर्पे, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.














