सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कॉन्फेडरेशन ऑफ रियल एस्टेट असोसियेशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रेडाई ही देशपातळीवर काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे. या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे काम क्रेडाई महाराष्ट्र करते. नुकतीच या संघटनेची सन २०२३ – २५ साठी राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या मध्ये क्रेडाई सिंधुदुर्गचे सचिव अभिजीत जैतापकर यांची सिटी ब्रॅन्डीग आणि टुरिझम या कमिटीवर निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल क्रेडाई सिंधुदुर्गच्या सर्व सदस्यांनतर्फे अभिजीत जैतापकर यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी बोलताना अभिजीत जैतापकर यांनी आपल्या निवडीबद्दल क्रेडाई महाराष्ट्रचे विशेष आभार मानले आणि असेच आपल्या जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांचे शासनस्तरावरील प्रश्न क्रेडाई महाराष्ट्राच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आणि त्यावर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी आपण कायम उपलब्ध असल्याची ग्वाही दिली.












