राज्यस्तरीय समरगीत स्फूर्ती गीत स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र कुडाळ गट द्वितीय

कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय समरगीत /स्फूर्ती गीत अंतिम स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ गट संघाने द्वितीय क्रमांक पटकवीला. विजेत्या संघाना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धा सातपूर नाशिक येथील कामगार कल्याण भवनात राज्यस्तरीय समर गीत /स्फूर्ती गीत स्पर्धा पार पडली. स्पर्धेत एकूण 19 संघांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक – अमरावती कला भवन केंद्र,द्वितीय क्रमांक – कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, तृतीय क्रमांक – कामगार कल्याण केंद्र,संभाजी नगर कोल्हापूर, उत्तेजनार्थ -1 कामगार कल्याण केंद्र, भंडारा -1नागपूर, उत्तेजनार्थ -2 गट नाशिक . या संघांनी पटकाविले. पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, एच. ए. एल. चे मुख व्यवस्थापक श्रीरंग कोथे, कल्याण आयुक्त रविराज इळवे सहा. कल्याण आयुक्त माधवी सुर्वे, सहा. कल्याण आयुक्त भावना बच्छाव, प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विजेत्या संघाना पारितोषिक देऊन गौर विण्यात आले. स्पर्धे साठी संघ गट कार्यालय चिपळूण चे अधिकारी अरुण लाड याच्या मार्गदर्शन खाली कामगार कल्याण केंद्र कुडाळ च्या केंद्र प्रमुख सुस्मिता नाईक, यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय स्पर्धेकरिता नाशिक येथे नेण्यात आला. संघाच्या यशस्वी साठी अर्धवेळ केंद्र सेवक अमोल तळावडेकर , श्याम तेंडोलकर, अनिल आचरेकर,संजय आठल्ये, मोतीराम प्रभू, सुरेश राऊळ, यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!