आंबोलीत धबधब्यानजीक ची घटना
सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथे माकडाने पळवलेली दागिन्याची डबी वाहतूक पोलिस कर्मचारी प्रकाश गवस यांच्या चतुराईमुळे परत मिळाली. त्यात सुमारे ४० हजार रुपयांची अंगठी होती. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आबोली धबधब्याच्या परिसरात घडली. बेळगाव येथील एका पर्यटकाच्या कारमध्ये सोन्याच्या दागिन्याची डबी होती ती बाजूला असलेल्या माकडाने पळविली. मात्र संबंधितांनी आरडाओरड केल्यानंतर त्या ठिकाणी जवळच असलेले वाहतुक पोलिस प्रकामा गवस यांनी तात्काळ धाव घेऊन ती अंगठी परत मिळवली












