तळेरे (प्रतिनिधी) : इंडियन जर्नालिस्ट युनियन, नवी दिल्ली आणि जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र तर्फे सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या दहावी,बारावी ते पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा १९ ऑगस्ट रोजी तळेरे येथे गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या मुलांची नावे पत्रकार संजय खानविलकर, तळेरे यांच्याकडे पाठवावीत असे आवाहन युनियनचे कोकण विभागिय अध्यक्ष सतिश साटम यांनी केले आहे.
इंडियन जर्नालिस्ट युनियन, नवी दिल्ली या युनियनचे राष्ट्रीय सचिव आणि जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करुन भेट वस्तूंचे वितरण शनिवार दि.१९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वा.तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटर सेंटरच्या हाॅलमध्ये करण्यात येणार आहे. सन २०२३ मध्ये दहावी, बारावी व पदवी उत्तीर्ण झालेल्या तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलांची नावे व माहिती १६ ऑगस्टपर्यंत पत्रकार संजय खानविलकर,तळेरे (मोबाईल नं.९४२३८१८४७४/ ८२०८५६४१३०) व पत्रकार गणेश चव्हाण,श्रावण (मोबाईल नं.९४२००८४१२५) यांच्याकडे नाव नोंदणी करावी. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नारायण पांचाळ, कोकण विभाग प्रमुख सतिष साटम हे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.












