बांदिवडे येथे रक्तदान शिबीर….! ; १७ रोजी बांदिवडे शाळा येथे आयोजन

कै. शिवप्रसाद गुरव यांच्या स्मरणार्थ, सनराईज सामाजिक संस्था आडवली व बांदिवडे ग्रामस्थ यांचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : ‘रक्तदान पुण्यदान’ या उक्ती प्रमाणे, मालवण तालुक्यातील बांदिवडे शाळा नं १ येथे १७ आँगस्ट रोजी कै. शिवप्रसाद गुरव यांच्या स्मरणार्थ, सनराईज सामाजिक संस्था आडवली व बांदिवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ ते ११ यावेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी लखन बांदिवडेकर ९४०४७५३६९४, तुषार चव्हाण ९४०५७३६९२० यांची संपर्क करावा. व जास्तीत जास्त रक्तदात्यांनी पुण्यदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!