14 ऑगस्ट रोजीचे ध्वजारोहन करण्याचा मान निवृत्त कॅप्टन राजाराम वळंजू यांना
वैभववाडी (प्रतिनिधी) : ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान अंतर्गत खांबाळे गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न झाला. यानिमित्ताने खांबाळे 14 ऑगस्ट रोजीचे ध्वजारोहण करण्याचा मान निवृत्त कॅप्टन राजाराम वळंजू यांना देण्यात आला. सरपंच गौरी पवार यांचे हस्ते त्यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा थोर विभूतींना, शूर वीरांना अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण खांबाळे सरपंच गौरी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपसरपंच गणेश पवार, सोसायटीचे चेअरमन तथा ग्रामपंचायत सदस्य प्रविण गायकवाड, माजी चेअरमन दीपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, मंगेश गुरव, प्राजक्ता कदम, मंगेश सूद, ग्रामसेवक नयना गुरखे,दत्तात्रय परब, गणेश सदाशिव पवार,मारुती परब, शिवाजी गुरव, पुंडलिक परब, कृषि सहाय्यक बालाजी वाघमोडे, राजाराम पवार, ग्रामपंचायत कर्मचारी अंबाजी पवार, नंदू पवार आदी उपस्थित होते.












