आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत सांगवे च्या वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश” अभियान चे आयोजन

माजी जि.प.अध्यक्ष सौ. संजना सावंत,गटविकास अधिकारी मा.श्री. अरुण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी): आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत सांगवे च्या वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश” अभियाना अंतर्गत* विविध कार्यक्रमाचे आयोजन सांगवे ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले होते. यावेळी सांगवे जाधववाडी तील माजी सैनिक मा. आबा बापू जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच शिलाफलकाचे अनावरण सौ.संजना सावंत,माजी जि.प. अध्यक्ष सिंधुदुर्ग, गटविकास अधिकारी कणकवली मा. श्री. अरुण चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत 75 प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली. तसेच गावातील शालेय विदयार्थ्यांनी मानवाकृती 75 या अंकाद्वारे अमृत महोत्सवी शुभेच्छा दिल्या व शूरवीरांना वंदना म्हणून 75 दीप प्रज्वलीत करून सर्वांनी पंचप्राण शपथ घेतली. सांगवे गावातील स्वातंत्रसैनिक, माजी स्वातंत्रसैनिक यांचा व त्त्यांच्या कुटूंबीयांचा शाल, श्रीफळ, सुपारी झाड व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सौ. संजना सावंत, माजी जि.प. अध्यक्ष सिंधुदुर्ग,गटविकास अधिकारी मा. श्री अरुण चव्हाण, सरपंच श्री संजय सावंत, उपसरपंच श्री अभिजीत कानेकर, माजी सभापती मा. श्री सुरेश सावंत,श्री विजय भोगटे, श्री महेंद्र सावंत माजी सरपंच,श्री प्रदिप सावंत माजी उपसरपंच , ग्रामविस्तार अधिकारी मा.श्री संजय कवटकर, सोसायटी चेअरमन श्री प्रभाकर सावंत, श्री चंद्ररतन कांबळे , व्हा. चेअरमन तसेच मुख्याध्यापक सौ म्हापसेकर मॅडम शालेय समिती अध्यक्ष श्री दिपक गांवकर, पोलीस पाटील श्री दामोदर सावंत श्री राजेश सापळे श्री राजेंद्र गावकर सौ.राजश्री वाळके , सौ शीतल नांदगावकर सौ.सुलोचना सुतार सौ.राजक्षी वाळके श्री कैलास सावंत, बाबू वाळके सुनील वाळके रमेश म्हापणकर,ग्रामपंचायत सर्व सदस्य, डॉक्टर विजय गांवकर, पशुवैद्यकीय डॉक्टर श्री लोखंडे व सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी आशा, सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी व विद्यार्थी व सांगवे गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!