आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भटवाडी सजा तलाठी योगेश आप्पासाहेब माळी यांनी सन 2022- 23 या वर्षात महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टांप्रमाणे ई फेरफार, ई पीक पहाणी, ई चावडी, कृषी गणना या आँनलाईन प्रणालीमध्ये उत्कृष्टपणे काम करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल स्वातंत्र्य दिनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सौरव कुमार अग्रवाल, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी,
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग मच्छिन्द्र सुकटे यांच्या उपस्थितीत होते.













