चिंदर ग्रामपंचायतच्या उपक्रमाचे होतेय कौतुक
आचरा (प्रतिनिधी) : अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने ऐतिहासिक ब्राम्हण देव अमृत तलावा काठी मधुकर(नारायण) पाताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन संपन्न झाला.यावेळी सरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, शशीकांत नाटेकर, जान्हवी घाडी, स्वरा पालकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर,केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर,अरविंद घाडी, माजी सभापती हिमाली अमरे,मनवा चिंदरकर,बाळा परब,निलिमा घाडी, सुनिल घाडी,भाई तावडे,दादू घाडी,भाई अपराज,बहूसख्यः शालेय विद्यार्थी,शिक्षक आदी उपस्थित होते.
सकाळी श्री रामेश्वर वि.का.स. से. सोसायटी येथे प्रथम ध्वजारोहण मधुकर(नारायण) पाताडे यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर भटवाडी शाळेत शाळा कमिटी अध्यक्ष महेंद्र कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.चिंदर ग्रामपंचायत येथे सरपंच दिपक सुर्वै यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, राजश्री कोदे,शशिकांत नाटेकर, स्वरा पालकर,सानिका चिंदरकर,जान्हवी घाडी,ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर,पोलिस पाटील दिनेश पाताडे,रतन बूटे,पंढरीनाथ करवडकर,चेअरमन देवेंद्र हडकर,व्हाईस चेअरमन सुनिल पवार,माजी सभापती हिमाली अमरे, प्रिया पालकर,संतोष अपराज, डाँ. कपिल मेस्री, डाँ. विवेक घाडगे, बाबा हडपी, आप्पा गावडे, शेखर पाताडे,अभय पाडावे, दिगंबर जाधव,निशिगंधा वझे, रोहिणी केळसकर,अमृता तोरसोळकर,विनिता मसुरकर,कविंद्र माळगांवकर,समिर अपराज,विश्राम माळगांवकर,नार्वेकर,दिनेश पाताडे आदी उपस्थित होते.












