खारेपाटण हायस्कूलचा विद्यार्थी कु.रुद्र राजु गर्जे याचा स्वातंत्र्यदिनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार ….

खारेपाटण (प्रतिनिधी ) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु.रूद्र राजू गर्जे याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी सन – २०२३ मध्ये २७८ गुण मिळवून गुणवत्ता यादीत राज्यात ७ वा क्रमांक प्राप्त केला होता. त्याबद्दल भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

जिल्हा मुख्यालय ओरोस पोलीस परेड मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर,जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,तसेच प्राथमिक.व माध्यमिक विभगाचे शिक्षणाअधिकारी व सर्व खात्यांचे पदाधिकारी उपस्थितीत होते. तर खारेपाटण हायस्कूलच्या वतीने मार्गदर्शक शिक्षक श्री ठाकुर उपस्थित होते.

रूद्र गर्जे या विद्यार्थ्याचा शिक्षण मंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आल्याबद्दल खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी विशेष कौतुक केले आहे.तर संपूर्ण खारेपाटण दशक्रोशीतून कु.रूद्र गर्जे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

error: Content is protected !!