15 ऑगस्ट स्वातंत्र दिनी प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथील विद्यार्थ्यांना शालेय बुट वाटप

श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघ कणकवली यांनी जपली सामाजिक बांधिलकी

कणकवली (प्रतिनिधी): 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघ कणकवली यांच्या वतीने बोर्डवे येथील प्राथमिक आश्रम शाळा बोर्डवे येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशावर परिधान करावयाचे बूट वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. या केलेल्या उपक्रमातून श्री स्वयंभू भालचंद्र टेम्पो संघ कणकवली यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून आली. यावेळी आश्रम शाळेचे अध्यक्ष गोसावी सर, मुख्याध्यापक आनंद कर्पे सर,शाळेतील सर्व शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ आणि टेम्पो संघाचे अध्यक्ष उदय सावंत,सचिव गणेश सावंत, समवेत मारुती वरवडेकर,चिंतामणी तिरोडकर,संदेश मेस्त्री, सुरेश सावंत, पप्पी सावंत, शरद परब, मकरंद राणे,दीपक जाधव,संतोष परब,संतोष मेस्त्री,शैलेश कदम, तुकाराम फोंडेकर,तेजस सावंत, संजय कांबळे,सिध्देश देसाई, प्रसाद डोंगरे ,भाई खंडबले,उत्तम ताम्हाणेकर आदी उपस्थीत होते.

error: Content is protected !!