‘गरुड झेप’ प्रकल्पांतर्गत 18 ऑगस्ट रोजी कुडाळ कॉलेज येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कुडाळ नगरपंचायत, एस आर एम कॉलेज कुडाळ आणि युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग यांचे संयुक्त आयोजन

आय.ए.एस अधिकारी करिष्मा नायर व विशाल खत्री , मुख्याधिकारी अरविंद नातू, मुख्याधिकारी सूरज कांबळे,
पोलीस इन्स्पेक्टर रुनाल मुल्ला,प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांची उपस्थिती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शासनाच्या गरुड झेप प्रकल्पांतर्गत कुडाळ नगरपंचायत कुडाळ यांच्या पुढाकाराने, जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०. ३० वा. युपीएससी – एमपीएससी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी , बारावी नंतर पदवी काळात कशी करायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग च्या वतीने द युनिक अकॅडमी पुणे चे तज्ञ मार्गदर्शक दिनेश ताठे करणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील आय.ए.एस अधिकारी करिष्मा नायर,विशाल खत्री, तसेच कुडाळ मुख्याधिकारी अरविंद नातू, वाभवे-वैभववाडी मुख्याधिकारी सूरज कांबळे,कुडाळ पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर रुनाल मुल्ला,कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक असे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी स्पर्धा परीक्षा युनिक प्रकाशन ची पुस्तके ४०% सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत. तरी कुडाळ परिसरातील आणि सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी पालक यांनी या मार्गदर्शन कार्यशाळेला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू,एस आर एम कुडाळ कॉलेजचे प्रचार्य व्ही बी झोडगे आणि युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग संचालक सचिन कोर्लेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!