बोर्डवे आश्रम शाळेला गरम पाण्यासाठी दिला स्टील बंब
कणकवली (प्रतिनिधी): वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांनी सामाजिक बांधिलकी जपत 76 व्या स्वातंत्र्यदिनीवबोर्डवे येथील आश्रमशाळेला स्वखर्चाने स्टील बंब भेट दिला.आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आंघोळी साठी गरम पाणी त स्टील बंब मुळे सहजशक्य होणार आहे. अचित कदम यांच्या दातृत्वाबद्दल आश्रम शाळेचे अध्यक्ष गोसावी, मुख्याध्यापक आनंद कर्पे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने अचित कदम यांचे आभार मानले.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बोर्डवे माजी सरपंच गजानन शिंदे, युवा मोर्चा चे सुभाष मालंडकर,आनंद घाडी, राजेंद्र कुमार मोडक, प्रदीप कदम,दिलीप तावडे,उर्मिला गोसावी, कर्पे सर,सोहेल खान,शंकर घाडी,ग्राम पंचायत सदस्य सौ सावंत, उपस्थित होते












