बोर्डवे रेल्वे फाटका जवळ रेल्वेच्या धडकेत तीन गवे ठार

कणकवली (प्रतिनिधी): नेत्रावती एक्सप्रेसच्या धडकेत तीन गवे रेडे ठार झाल्याची घटना बोर्डवे रेल्वे ट्रॅक वर 18 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बोर्डवे सरपंच यांनी तात्काळ घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांना दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी घुणकीकर, सर्जेराव पाटील वनरक्षक, सिद्धार्थ शिंदे, राठोड यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. दोन गवारे यांना रेल्वेची धडक बसून ते ट्रॅकच्या बाजूला मृता अवस्थेत पडले होते. तर एक गवारेडा छिन्न विच्छिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅक वरच मृता अवस्थेत पडला होता. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रेल्वे ट्रॅक वरील मृत गवारेडा बाजूला केला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या टीम कडून मृत गवारेड्यांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर मृत गवारेड्यांचे दफन करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!