नवीन ग्रामपंचायती चे स्वप्न साकार हाेण्यासाठी देवी चरणी घातले हाेते साकडे
कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली या स्वतंत्र पुनर्वसित गावठाणातील सर्व पदाधिकारी यांनी आज प्रथम श्रावणी सोमवार चे औचित्य साधून आई कुर्ली देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.गेले सहा महिने स्वतंत्र नवीन कुर्ली ग्रामपंचायत होण्यासाठी अथक प्रयत्न घेऊन आज ती सर्वांची इच्छा पूर्ण झाली.हे नवीन ग्रामपंचायत चे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाले होते.त्यावेळी वेळोवेळी आई कुर्ली देवीच्या चरणी साकडे घातले होते की जे काही अडथळे येत आहेत ते बाजूला सारून आम्हा सर्वांचे नवीन स्वतंत्र कुर्ली ग्रामपंचायत लवकर होऊ दे आणि ती मागणी आई कुर्ली देवी ने पूर्ण केली आई कुर्ली देवीच्या आशीर्वादाने आज स्वतंत्र नवीन कुर्ली ग्रामपंचायत चे स्वप्न पूर्ण झाले असे सर्व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि प्रकल्प ग्रस्त संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी सांगितले. आज सोमवार दि.२१ऑगस्ट2023 रोजी सर्व प्रकल्प ग्रस्त ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्त संघटनेचे पदाधिकारी यांनी आई कुर्ली देवीचे दर्शन घेतले व नवीन कुर्ली गाव असाच एकमताने राहून ,नव्याने होत असलेली नवीन कुर्ली ग्रामपंचायत महाराष्ट्रात नंबर १ची ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला येऊ दे अशी कुर्ला देवी मातेला सर्वांनी प्रार्थना करून आशीर्वाद घेतला.













