मनोरमा भुजबळ यांचे निधन….!

शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील जामसंडे – कावलेवाडी येथील प्रतिष्ठित रहिवाशी मनोरमा केशव भुजबळ यांचे मुंबई येथे राहत्या घरी दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा.२० मी. अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ” माई ” या नावाने सुपरिचित होत्या.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून , नात, २ विवाहित मुली, २ जावई, भाऊ, भावजय, भाचा, भाची, पुतणे आणि ४ नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रहार दिव्यांग संघटनेच्या देवगड तालुका अध्यक्षा श्रद्धा बापू आंबेरकर यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!