चौके ( अमोल गोसावी ) : गेल्या आठवड्यात देवबाग मोबार वाडीतील ग्रामस्थांनी देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रीक्स यांच्याजवळ मंदिरासाठी सोलर लाईट साठी मागणी केली. त्यानुसार पास्कोल यांनी सदर बाब महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना अध्यक्ष गणेशजी जगन्नाथ कदम यांना ग्रामस्थाच्या मागणी पत्रासहित सह्या घेऊन वॉट्सअप द्वारे मागणी केली. सदर सोलर लाईट गणेशजी कदम यांनी विलंब न लावता 2 दिवसातच पास्कोल रॉड्रीक्स यांच्या कडे पाठवली. आणि काल सर्व ग्रामस्थ आणि मंदिराचे विश्वस्थ यांच्या उपस्थितीत सोलर लाईट मंदिरासाठी सुपूर्द केली. ग्रामस्थांनी कदम यांच्या कुटुंबीयांसाठी देवाजवळ प्रार्थना केली आणि आभार व्यक्त केले.
देवबाग, मोबारवाडीतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार श्री. देव मोबरेश्वर मंदिराला मोफत सोलर लाईट भेट












