उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरें चे नवीन कुर्लीवासीयांनी मानले आभार

नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले ऋण

कणकवली (प्रतिनिधी) : नविन कुर्ली गावची स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुरीचा अध्यादेश अलीकडेच राज्य शासनाने निर्गमित केला आहे.मात्र नवीन कुर्ली गावची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती साठी त्रुटी मुक्त परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. डेप्युटी सीईओ तनपुरे यांनी दाखविलेल्या तत्पर कर्तव्यदक्षतेबद्दल नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डेप्युटी सीईओ तनपुरे यांची सदिच्छा भेट घेत आभार मानले. यावेळी नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटना कार्याध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश् पाटील, नवीन कुर्ली प्रकल्प संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना कणकवली तालुका सचिव – श्री रवींद्र नवाळे .राजेश तेली, .भगवान तेली ,एकनाथ चव्हाण , संतोष सुद, शांताराम पार्टे,मधुकर परब,विजय परब आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!