जिल्हास्तरीय शालेय शुटिंग बाँल स्पर्धा…..!

जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलचा दबदबा

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलच्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय शासकीय शुटींग बाँल स्पर्धा चार गटात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन आचरा गावचे प्रतिष्ठित व्यापारी मेडिकल व्यावसायिक मांगरीष सांबारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सतरा वर्षे मुलगे, गटात, जनता विद्या मंदिर त्रिंबक-प्रथम, आ.र.पी.डी हायस्कूल सावंतवाडी व्दितीय तर सौ. ही. बा. वरस्कर हायस्कूल वराड यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

सतरा वर्षे मुली, गटात, जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रथम, सौ. हि. भा. वरस्कर हायस्कूल वराड व्दितीय तर शिवाजी विद्यालय काळसे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. ऐकोणीस वर्षीय मुलगे गटात कुडाळकर हायस्कूल प्रथम, टोपीवाला हायस्कूल मालवण व्दितीय तर जनता विद्या मंदिर त्रिंबक यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. ऐकोणीस वर्षीय मुली गटात कुडाळकर हायस्कूल कुडाळ प्रथम, जनता विद्या मंदिर व्दितीय तर प्रगत विद्या मंदीर रामगड यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेत ऐकोणीस संघानी सहभाग घेतला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शुटिंग बाँल असोसिएशनचे जिल्हा सेक्रेटरी सुरेंद्र(अन्ना) सकपाळ, जिल्हा संघटक सुभाष तळवडेकर, मालवण तालुका समन्वयक अजय शिंदे, संस्था सेक्रेटरी अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, क्रिडा शिक्षक महेंद्र वारंग, पंच सिताराम सकपाळ, जयवंत बागवे, राजू भावे, अमेय लेले, क्रिडा शिक्षक दिनेश सावंत, शैलेश मुळिक, वैभव कोंडस्कर, अविनाश परब, श्रावण गवळी, सागर सावंत, पाताडे सर, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!