भारताची चंद्रावर यशस्वी भरारी ; कुडाळमध्ये जल्लोष !

कुडाळ (अमोल गोसावी) : चंद्रयान ३ ची मोहीम फत्ते झाल्यानंतर देशभरात सर्वत्र जल्लोष होत असून कुडाळमध्ये सुद्धा भाजपच्या वतीने फटाके लावून तसेच लाडू वाटून जल्लोष करण्यात आला. कुडाळ पोस्ट नजिक भाजप कार्यकर्त्यांनी “भारत माता की जय” च्या घोषणा देत परिसरात एक वेगळा उत्साह निर्माण केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी चांद्रयान ३ मोहीम फत्ते झाल्यानंतर उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप जेष्ठ नेते रणजित देसाई, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, भाजप जिल्हा चिटणीस विनायक राणे, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेविका चांदणी कांबळी, भाजप महिला मोर्चा चिटणीस रेखा काणेकर, चंदन कांबळी, शक्तिकेंद्र प्रमुख राजू बक्षी, भाजप प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर, माजी सभापती किशोर मर्गज, श्रावण शिरसाट, दीपक कुडाळकर, तसेच भाजप कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!