सावंतवाडी (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय संमेलन सावंतवाडी येथे घेण्याचे आज झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या कार्यकारणी बैठकीत ठरले. दरवर्षी एका तालुक्यात हे संमेलन आयोजित केले जाते. नुकत्याच कुडाळ येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत यावर्षीचे जिल्हा साहित्य संमेलन घेण्याबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे यावर्षीच्या जिल्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद सावंतवाडी शाखेने स्वीकारले आहे. नोव्हेंबर महिन्यात हे साहित्य संमेलन सावंतवाडी येथे संपन्न होणार असून, साहित्य क्षेत्रातील नामवंत मंडळी या संमेलनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सावंतवाडी शाखेचे अँड. अध्यक्ष संतोष सावंत व सचिव प्रतिभा चव्हाण यांनी दिली. या बैठकीसाठी सहसचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, कोषाध्यक्ष डॉक्टर दिपक तुपकर, जिल्हा कार्यकारणीचे सचिव भरत गावडे, अँड. नकुल पारसेकर, दीपक पटेकर, रामदास पारकर, प्राध्यापक रुपेश पाटील, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत भोसले उपस्थित होत्या.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय संमेलन सावंतवाडीत -अँड संतोष सावंत












