कणकवलीत ब्रिज खाली पार्क केलेल्या डंपरची चोरी

पोलिसांचा ताफा ओसरगाव टोलनाक्यावर तपासणीत व्यस्त

शहरात चोरट्यांचा धमाका

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उबाळे मेडिकल समोरील उड्डाण पुलाखाली लावलेला गंधार सदानंद बाणे यांच्या मालकीचा डंपर (क्र – एम.एच -०७ सी-६३०८) असून रात्री चोरीस गेला आहे. भर कणकवली शहरातून हा डंपर चोरी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे कणकवली पोलीसांचा ताफा काल शुक्रवारी ओसरगाव टोलनाक्यावर कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करत होते. पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा ताफा हायवेवर वाहन तपासणी करत असतानाच त्यानंतर ही चोरी करण्याचे धाडस चोरांनी केले आहे.

चोरीस गेलेल्या डंपरच्या समोरील बाजूस सफेद कलर असून मागील हौदा भगव्या कलर असलेला आहे. त्या डंपरच्या काचेवर श्री. गांगोभैरी, ब्राह्मणदेव प्रसन्न, नमो भालचंद्राय,दत्तकृपा असे रेडियमने लिहिलेले आहे. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.जर हा डंपर कोणाला दिसला असेल तर त्यांनी मालक श्री. बाणे मो.९४२३३००४९६ किंवा कणकवली पोलीस ठाण्यात यांना तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!