कणकवलीत आज बरसणार संगीत श्रावणसरी

माजी नगराध्यक्ष नलावडें च्या सौजन्याने यंगस्टार मित्रमंडळाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील काशीविश्वेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने यंगस्टार मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भक्तीगीत, भावगीत, या संगीतमय कार्यक्रमाचा शुभारंभ आज दुपारी 3 वाजता भालचंद्र महाराज संस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आदर्श संगीत विद्यालय कणकवली यांचे सहकार्य या उपक्रमाला असणार आहे.

error: Content is protected !!