कणकवली येथे प. पू. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.!

कणकवली (प्रतिनिधी) : संत शिरोमणी रविदास महाराज यांची आज संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांनी एकत्र येत ६४५ वी जयंती कार्यक्रम कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता. प. पू. संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांची एक अनोखी अशी शोभायात्रा शहरातून ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. पालखी मध्ये असंख्य समाज बांधव आणि शिवसेना नेते संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक सहभागी झाले.

प. पू. संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांची आरती करण्यात आली. तसेच प्रतिमा पूजन, भारत पेंडूरकर यांनी “या जन्मावर या जगण्यावर शतदा: प्रेम करावे” हे स्वागत गीत सादर केले तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन कुडाळ – मालवण मतदार संघाचे आम. वैभव नाईक, नगराध्यक्ष समीर नलावडे,सुजित जाधव, विजय चव्हाण, संजय कदम, पंढरी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

चर्मकार समाज उन्नती आणि संघटन होऊन आपला समाज एकजुटीने राहिला पाहिजे. ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन संत रोहिदास जयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न केले. त्याकरिता सुजित जाधव यांच्या घरी सहभाग घेऊन विजय मुकुंद चव्हाण यांना रविदास महाराज जयंती कार्यक्रमासाठी समिती प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. जयंती भव्य आणि दिव्य होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधवांनी प्रयत्न केले. चर्मकार समाजातील सर्व सामाजिक संघटनानी एकत्र येऊन हा जयंती कार्यक्रम साजरा केला.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, यावर्षीचा कार्यक्रम आपणास या ओव्हरब्रिज खाली करावा लागतोय. त्याबाबत मी आपली माफी मागतो. मात्र येणाऱ्या पुढील वर्षीचा कार्यक्रम जयंती उत्सव नव्याने होणाऱ्या भावनातच साजरा केला जाईल. तसेच समाज बांधवांचे असलेले प्रश्न कोणतेही राजकारण न करता मार्गी लावण्याचे काम करू, असे आश्वासन श्री. नलावडे यांनी दिले.

पुढे बोलताना आम. वैभव नाईक म्हणाले, विविध भागातून आलेल्या समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. ६४५ वर्षांपूर्वी संत रविदासांनी काय लिहिले त्याचा आपण ६४५ नंतर काय करतोय त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. गेले कित्येक वर्षांपासून हा समाज खालच्या पातळीवर असलेला समाज आज प्रत्यक्षात पाहिल्यास विविध क्षेत्रात ताठ मानेने आपले जीवन जगताना दिसत आहे. तसेच हा समाज आणि समाज बांधवांची वाटचाल प्रगती पथावर आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. दरम्यान कार्यक्रमात बोलताना आम. नाईक यांनी चर्मकार समाज बांधवांना आपणाकडून समाज भवन काम पूर्णत्वास आणण्यासाठी १० लाख रुपयांची मदत देखील समाज भवनासाठी जाहीर केले. यापुढे समाजाला काही मदत हवी असेल तर आपण ती करू असेही आम. नाईक म्हणाले.

कार्यक्रमासाठी नामदेव जाधव, राजेंद्र चव्हाण, आनंद जाधव, विठ्ठल चव्हाण, अंकुश चव्हाण, प्रकाश वाघेरकर, महेंद्र चव्हाण, मयूर चव्हाण, प्रथमेश जाधव, अमित जाधव, अनिल चव्हाण,यांच्यासह सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी अतोनात मेहनत घेतली.

तर सुजित जाधव यांनी कणकवली शहरामध्ये चर्मकार समाज बांधवांचे संत रविदास महाराजांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणी व्हावा त्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जागेसाठी सहकार्य करावे, अशी मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचेकडे केली. चर्मकार समाज भवानासाठी १५ लाख रुपये आम. निधी फंडातून वैभव नाईक यांनी दिले. अजून १० लाख रुपये देखील देणार असल्याचे आम. वैभव नाईक यांनी घोषित केले. त्याबद्दल जाधव यांनी त्यांचे आभार मानले

यावेळी व्यासपीठावर आम. वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे,अनिल निरवडेकर, विराज भोसले, चंद्रसेन पाताडे, विठ्ठल चव्हाण, अंकुश चव्हाण, अनिल जाधव, महेंद्र चव्हाण आनंद जाधव, मानसी चव्हाण, सुप्रिया जाधव, मयुरी चव्हाण, डॉ. सोमनाथ कदम, नंदन वेंगुर्लेकर, प्रकाश वाघेरकर, प्राजक्त चव्हाण,डॉ. प्रदीप बांबार्डेकर, भारत पेंडूरकर, प्रसाद मसुरकर, .प्रदीप मांजरेकर, विलास गुडेकर, चानी जाधव

तसेच दुपार सत्रात प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांचे व्याख्यान देखील संत रोविदास जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. तर महिलांसाठी खास कार्यक्रम खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर व चंद्रसेन पाताडे यांनी केले तर आभार मंगेश आरेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!